पोस्ट्स

हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी विचार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रतनजी टाटा - motivational story - मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी.....

इमेज
 “मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन." जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ,  ती आठवण सांगाल का"? रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला." पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्...

"भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार? - Motivational story

इमेज
*क्षण आनंदाचे* सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस? यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही; पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर. बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही. कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला स...

लग्नात लाखो रुपये खर्च आणि आता ICU मध्ये भरती - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी story

इमेज
भाऊंच्या मुलीच लग्न झालं...लग्नात लाखो रुपये खर्च झाले.. लग्न झाले... पार पडले.. लग्नात हजार ,दोन हजार लोकं आली.. लांब लांब चे नातेवाईक आले (सुट्या काढून) मुक्कामही केले... भाऊची कॉलर टाईट झाली... वॉर्डातून, गावातून निघतांना वेगळाच आनंद असायचा.... पोरीच्या लग्नानंतरफोवरडे भाऊ जवळपास दोन महिने लग्नाच्याच चर्चा करायचे...(जीवनभराची कमाई लग्नात निछावर करून... आटापिटा करून धुमधडाक्यात भाऊने पोरीचं लग्न लावले)...... मग काय ... चर्चेत एकच .. "२००० लोकं आली,मुंबई, दिल्ली विदेशातून संबंधित नातेवाईक आले.. .... *पाहुनचार* तर बोलायचं कामच नाही..... लग्न आटोपून दोन तीन महिने गेले... पण भाऊ लग्न नाही विसरला...... " *भाऊ आजारी पडला... गेल्या सात दिवसापासून भाऊ ICU मध्ये भरती आहे* " पण... लग्नात आलेल्या २००० लोकांचा कुठं पत्ताच दिसत नव्हता" कुठे गेली ती पाहुनचार करणारी लांब लांब ची माणसं? *भाऊ ने होती नव्हती कमाई लग्नात खर्च केली... कर्जही घेतले..... आणि आता ICU मध्ये भरती आहे सात दिवसाचा ICU चा खर्च ...डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नाही....* *भाऊ ची पत्नी व्याजाने पैसे घेत ...

हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा... Motivational story

जगणं कोणासाठी  हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे, आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपय...