तुमच्या दुकानात देव मिळेल कां ? -- हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा
पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला. तुमच्या दुकानात देव मिळेल कां ? -- हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला ? त्या मुलाने दुकानदारास विचारले तुमच्या दुकानात देव मिळेल का ? हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला. प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का ? शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का ? त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत ? मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे ? तु देव विकत घेऊन करणार काय ? प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दु...