भाऊ आणि बहीण चे निरागस प्रेम - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा

 चार वर्षांचा मुलगा त्याच्या सहा वर्षांच्या बहिणीबरोबर बाजारात गेला होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याची बहीण मागे राहिलेली आहे. तो थांबला आणि त्याने मागे वळून पाहिले. ती एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहिली होती आणि काहीतरी मोठ्या औत्सुक्याने न्याहळत होती.


भाऊ आणि बहीण चे निरागस प्रेम - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा   

तो माघारी तिच्याजवळ गेला आणि विचारले, तुला काही हवयं का? तिने एका बाहुलीकडे बोट केले. त्या मुलाने एका जबाबदार भावाप्रमाणे ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. ती खूप आनंदी झाली होती.


दुकानदार हे सगळे पाहात होता. त्या मुलाचे प्रौढासारखे वागणे पाहून तो चकित झाला. मग तो मुलगा काउंटरजवळ आला आणि दुकानदाराला विचारले, ती बाहुली केवढ्याला आहे?


तो दुकानदार अनुभवी आणि समंजस होता. त्याने आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले होते. त्यामुळे त्याने अतिशय प्रेमाने त्या मुलाला विचारले, ठीक आहे, तू किती पैसे देऊ शकतो.


समुद्र किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले मुलाने खिशातून काढले आणि दुकानदाराला दिले. दुकानदारही जणू काही पैसे मोजत असल्याप्रमाणे ते शिंपले मोजू लागला. मग त्याने मुलाकडे पाहिले. मुलाने काळजीने विचारले, कमी आहेत का ?


दुकानदार म्हणाला, नाही, नाही. बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्तच आहेत. मग दुकानदाराने त्यातील चार शिंपले घेतले आणि उरलेले मुलाला परत दिले. त्या मुलाने ते शिंपले खिशात टाकले आणि तो बहिणीबरोबर चालायला लागला.


हे सगळे इतका वेळ पहात असलेला दुकानातील नोकर चकित झाला. त्याने मालकाला विचारले, चार शिंपल्यांच्या मोबदल्यात तुम्ही त्याला महागडी बाहुली दिली ?


दुकानदार स्मितहास्य करून म्हणाला, आपल्यासाठी हे फक्त शिंपले आहेत. त्या मुलासाठी ते अतिशय मौल्यवान आहेत. या वयात पैसे म्हणजे काय हे त्याला माहीत नाही. पण मोठा झाल्यावर त्याला समजेल आणि जेव्हा त्याच्या लक्षात येईल की, त्याने केवळ शिंपल्यांच्या मोबदल्यात बहिणीसाठी बाहुली खरेदी केली होती, तेव्हा त्याला माझी आठवण येईल. त्याचबरोबर या जगात चांगली माणसेदेखील आहेत, याची त्याला जाणीव होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी नसतो तर काय झालं असतं? - Real fact story

तुमच्या दुकानात देव मिळेल कां ? -- हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा

लग्नात लाखो रुपये खर्च आणि आता ICU मध्ये भरती - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी story