संघटन का महत्वाचे - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा
एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. 100 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली.
पण, रोज २० विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा. 80 विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते.
नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे नवीन सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे वस्तीग्रह आणि ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली. ज्या टिफिनला बहुमत प्राप्त होईल, तो टिफिन देण्याचे ठरविण्यात आले.
उपमा हव्या असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले. उर्वरित 80 विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.
*पदार्थानुसार मतदान %*
*18%: मसाला डोसा*
*16%: आलू पराठा आणि दही*
*14%: रोटी आणि सबजी*
*12%: ब्रेड आणि बटर*
*10%: नूडल्स*
*10%: इडली सांबार*
*20%:उपमा*
वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले. याचा परीणाम असा झाला कि,
मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार, उपमाच सुरू ठेवण्यात आला.
धडा: जोपर्यंत 80% लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, 20% लोक 80 % वर राज्य करतील.
संघटन का महत्वाचे हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा