बाप" नावाचे सुरक्षित छप्पर - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा
बाप" नावाचे सुरक्षित छप्पर..
शब्दांच्या कोंदणात आज मला एका हिऱ्याला बसवायचे आहे स्वतः उन्हात उभे राहून सावली देणाऱ्या या बापावर थोडेसे लिहायचे आहे
त्याला अपेक्षा नसते कोणाकडूनच त्याला फक्त देणेच जमते
स्वतः साठी जगणे काय असते हेच मुळी त्याला माहित नसते
बाप नावाचे हे सुरक्षित छप्पर आयुष्यात फार मोलाचे ठरते हाच बाप जेव्हा पाठीशी असतो तेव्हा खऱ्या अर्थाने कुणाचीच गरज नसते
तो फार कमी वेळ घरात असतो डोळ्यांना देखील फार कमी दिसतो
आईसारख्या साऱ्या भावना तो मांडून व्यक्त देखील होत नसतो पण जेव्हा जेव्हा मुलं हरतात ना ! तेव्हा आधार देऊन उभे करणारा
हाच असतो एका मुलाला तेव्हा खऱ्या अर्थाने बापामधला मित्र भेटतो
तो आयुष्यभर खस्ता खातो पण कुटुंबाला काही कमी करत नाही बापाच्या राज्यात अनुभवलेले सुख पुन्हा कधीच भेटत नाही
थकले जरी शरीर त्याचे तरी एका कोपऱ्यात बसून तो सारे काही न्याहाळत बसतो आजही तो न बोलताच मुलांचीच काळजी करतांना दिसतो
आयुष्यभर कष्ट करून देखील त्याची ओंजळ नेहमी रिकामीच असते खरे सांगायचे तर मुलांच्या सुखातच त्याचे खरे सुख लपलेले असते
त्याच्या खांद्यावर बसून फिरण्याच सुख प्रत्येक मुलाला जरूर मिळावे प्रत्येकाच्या डोक्यावर हे बाप नावाचे छप्पर कायम असावे हे बाप नावाचे छप्पर कायम असावे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा