भाऊ आणि बहीण चे निरागस प्रेम - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा
चार वर्षांचा मुलगा त्याच्या सहा वर्षांच्या बहिणीबरोबर बाजारात गेला होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याची बहीण मागे राहिलेली आहे. तो थांबला आणि त्याने मागे वळून पाहिले. ती एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहिली होती आणि काहीतरी मोठ्या औत्सुक्याने न्याहळत होती. भाऊ आणि बहीण चे निरागस प्रेम - हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा तो माघारी तिच्याजवळ गेला आणि विचारले, तुला काही हवयं का? तिने एका बाहुलीकडे बोट केले. त्या मुलाने एका जबाबदार भावाप्रमाणे ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. ती खूप आनंदी झाली होती. दुकानदार हे सगळे पाहात होता. त्या मुलाचे प्रौढासारखे वागणे पाहून तो चकित झाला. मग तो मुलगा काउंटरजवळ आला आणि दुकानदाराला विचारले, ती बाहुली केवढ्याला आहे? तो दुकानदार अनुभवी आणि समंजस होता. त्याने आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले होते. त्यामुळे त्याने अतिशय प्रेमाने त्या मुलाला विचारले, ठीक आहे, तू किती पैसे देऊ शकतो. समुद्र किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले मुलाने खिशातून काढले आणि दुकानदाराला दिले. दुकानदारही जणू काही पैसे मोजत असल्याप्रमाणे ते शिंपले मोजू लागला. मग त्याने म...